सातपुडा जंगल सफारीत प्रथमच घडले ‘वाघोबाचे’ दर्शन

0
62

सातपुडाचा परिसर भविष्यात नक्कीच नावारुपाला येणार

साईमत/रावेर/प्रतिनिधी

सातपुडा जंगल सफारीसाठी १२ नोव्हेंबर रोजी न्या.शंकर पवार आणि त्यांचे सहकारी आले होते. तेव्हा त्यांनी सकाळी सात वाजेपासून रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात जंगल सफारीस सुरुवात केली. सुरुवातीलाच मोर, लांडोर यांचा ग्रुप दिसून आला. पुढे शिकारी पक्षी, व्हाईट आय बाजड व सिरकीर मालकोवा पक्षी दिसून आले. त्यानंतर साधारण आठ वाजेच्या सुमारास सफारी रस्त्याने रुबाबात चालत असणारा बिबट्या दिसून आला. त्यापासून पाच ते सहाशे मीटर अंतरावर सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे दर्शन घडून आले. दरम्यान, भविष्यात सातपुडा जंगल सफारीचा परिसर नक्कीच नावारुपाला येईल, असे मत न्या.शंकर पवार यांनी व्यक्त केले.

जंगल सफारीत पावर गंगोत्री धबधबा, चिंचाटी धरण, अंजन कुटी, बांबू कुटी, नेकलेस पॉईंट, सातपुडा व्हिव्ह पॉईंट पाहून त्यांचे दृश्य त्यांनी मोबाईलमध्ये टिपले. त्यांच्या मते जळगाव जिल्ह्यातील पाल हे हिमालय, शिमला, उत्तराखंडची अनुभूती देते. येथील जंगल निसर्गरम्य आहे. मात्र, परिसरात पर्यटकांची खूपच कमतरता आहे. अंजन मचनावरून पाहिलेले चिंचाटी धरण परिसर ताडोबा जंगलाची आठवण करून देतो. तसेच १५० ते २०० फुटाच्या अंतरावरून पडणारे गंगोत्री धबधब्याचे पाणी धूत सागरासारखे दिसते. यावल वन विभागातील सातपुडा जंगल सफारी करून आम्हाला खूप आनंद मिळाल्याचे न्या.शंकर पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here