साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यला 75 वर्षे पूर्ण झाल्याने आणि त्याच वेळी रक्षाबंधना चा सण सोबत येणे हा दुग्ध-शर्करा योग या वर्षी आल्याने या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्यध्यक्षा- शुभांगी पाटील यांनी एक लाख शिक्षक पदविधारांना राख्या पाठवून अनोख्या रीतीने साजरा केला आहे.
राज्यातील हजारो शिक्षक, पदवीधर व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुभांगी पाटील यांनी टीचर्स असोसिएशन,स्टुडंट्स असोसिएशन या संघटनांच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून त्या माध्यमातून असंख्य प्रश्न सोडवली आहेत व सोडवत आहेत. ज्या मध्ये प्रामुख्याने सुमारे पंचावन्न हजार विना अनुदानित शिक्षकांचा पोटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्या साठी आझाद मैदानावर सात दिवस अन्न जल त्याग केला त्या प्रसंगी जिवावर बेतले रुग्णालयात दाखल व्हावे लागले , सरकार ला धारेवर धरले पण प्रश्न तडीस नेला. असे असले तरी या राज्यात शिक्षक, पदविधारांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत व या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी “एक राखी पाठवून” शिक्षक पविधारांना विश्वासात घेण्याचा उपक्रम शुभांगी पाटील राबवित आहेत.
या माध्यमातून नाशिक विभागातील ,धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या जिल्ह्यातील एक लाख, शिक्षक, पदवीधर व नागरिक पदाधिकारी यांना राख्यांचे पाकीट पोहचवण्याचे काम शुभांगी ताई पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून केले आहे, व त्या सोबतच स्व-हस्ताक्षरात स्वाक्षरी केलेले एक लाख शुभेच्छा पत्र देखिल या राखी सोबत पाठवले आहेत. व आज रक्षा बंधनाच्या पवित्र दिनी एक लाख शिक्षक-पदवीधर शुभांगी ताईंची राखी आपल्या हातावर बांधून आपले भावा-बहिणीचे नाते दृढ करणार आहेत.
रक्षा बंधन म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची भावाने घेतलेली जबाबदारी आणि राखी बांधणे म्हणजे बहिणीने भावांची स्वीकारलेली जबाबदारी आणि म्हणून या राज्यातील शिक्षक-पदविधारांची जबाबदारी या बहिणीने स्वीकारलेली असून त्यांच्या प्रश्नांसाठी लढा देण्यासाठी संघटित करण्यासाठी हे राखी चे बंधन बांधले आहे. या राज्यातील एकही शिक्षक, एकही पदवीधर बेरोजगारी ने आत्महत्या करू नये, एकही भावाच्या डोळ्यात अश्रू येवू नये या साठी राखी च्या नात्याने वचनबद्ध होण्याचा निर्धार शुभांगी ताई यांनी व्यक्त केला आहे.
विभागातील सर्व जिल्ह्यातील शाळांवर तसेच नागरिकांपर्यंत शुभांगी ताई ची राखी पोहचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र टीचर्स व स्टुडन्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकारी यांनी पार पाडली असुन या अनोख्या उपक्रमाने असंख्य शिक्षक-पदवीधर भारावून गेले असून अनेकांनी आपल्या भावना आणि प्रेमसंदेश पाठवून शुभांगी पाटील यांचे आभार मानले आहे.