रावेरचे श्रीराम पाटील यांनी केला भाजपात प्रवेश

0
3

साईमत, रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील उद्योगपती श्रीराम पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत बुधवारी, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. श्रीराम पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांची कार्यशैली यावर प्रभावित होऊन त्यांच्या कार्यावर विश्‍वास ठेवत पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्रीराम दयाराम पाटील (चेअरमन श्रीराम उद्योग समूह), शितल रमेश पाटील (मा. नगराध्यक्ष नगरपरिषद, रावेर), अब्दुल मुत्तलीफ (मा. उपनगराध्यक्ष नगरपरिषद, रावेर), सचिन अशोक मोरे (उपसरपंच, बोरावल, ता. यावल), सोपान पाटील (संचालक, रावेर पिपल्स बँक), केतन राणे (संचालक, विकासो विवरे), कुलदीप पाटील (संचालक, विकासो बोरावल), राजेंद्र चौधरी (मा. ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), स्वप्नील पाटील (सचिव, मायर्को व्हिजन अकॅडमी, रावेर), प्रशांत पाटील (मा. ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ), विनोद पाटील (मा. संचालक, विकासो पातोंडी), निलेश पाटील यावल, रामचंद्र पाटील प्रगतीशील शेतकरी पातोंडी, गोविंद पाटील प्रगतीशील शेतकरी केऱ्हाळे, लक्ष्मण चौधरी अहिरवाडी, सुरज कोलते जळगाव, नावा खाटीक रावेर यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती

प्रवेशवेळी गोपाल दर्जी अध्यक्ष दर्जी फाउंडेशन जळगाव, प्रल्हाद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, महेश चौधरी भाजपा ता. अध्यक्ष रावेर, पद्माकर महाजन, प्रवीण पाचपोहे, सुनील पाटील मा. भाजपा ता. अध्यक्ष रावेर, राहुल पाटील, शेख जाहीर विवरा, बंडू पाटील रावेर, दीपक नगरे, जयवंत पाटील रावेर, प्रशांत चौधरी, नितिन बिरपण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here