साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय , तसेच ओरीऑन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या आगमनाचे स्वागत केले. गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे सुपुत्र कुणाल कृष्णकुमार फालक व सायली कुणाल फालक या दाम्पत्याच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.
शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी परिश्रम घेऊन गणरायाच्या मूर्तीची आरास तयार केली.प्रसंगी शाळेच्या मुख्या.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.