घटस्थापना दिनी श्री संत मुक्ताई जन्मोत्सव, सोहळ्याची जय्यत तयारी

0
22

श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह वारकऱ्यांतर्फे दुर्गा सप्तशती पारायण सेवा

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. ३ रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन आहे. हा जमोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षी प्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसराच्यावतीने हजारो सेवेकऱ्यांतर्फे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ(कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे “दुर्गा सप्तशती” पारायण सेवेचे आयोजन केले आहे.

सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांच्यासह श्री स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी परिवार ,मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसर यांच्यावतीने केले आहे.

तसेच ज्यांना श्री संत मुक्ताई समाधी स्थळ श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जुने मंदिर येथे येणे शक्य नाही. त्यांनी प्रत्येक गावातील मंदिरात किंवा घरोघरी आई साहेब मुक्ताई यांचा फोटो पूजेसाठी ठेवून श्री सप्तशती पारायण करून जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असेही आवाहन केले आहे.

आदीशक्ती, मुळमाया, ब्रम्हचित्कला, योगमाया, जगत्त्रयजननी, आई मुक्ताई नवरात्रातील घटस्थापनेच्या शुभदिनी शालीवाहन शके १२०१ प्रमाथीनाम संवत्सर, आश्विन शुध्द प्रतिपदा १२ ऑक्टोबर १२७९ शुक्रवारी सायंकाळी झाला. ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला, तिचे वर्णन श्री भागवतात दहावे स्कंदात योगमायेचे रूपाने आलेले आहे. दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका , माया, नारायणी, इशानी, शारदा व अंबिका अशी चौदा नावे श्री महाविष्णूंनी ज्या आदीशक्ती दिलेली आहेत. त्या योगमायेचाच “अवतार” म्हणजे श्री संत मुक्ताबाई होत. ती तीन ही देवाची जननी आहे.

सप्तशती पारायण सेवेने जन्मोत्सव साजरा होणार

दिंडोरी दरबार प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील हजारो महिला व पुरुष तसेच युवक व युवती सेवेकऱ्यांनी परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने जगत्त्रयजननी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा जन्मोत्सव तिर्थ क्षेत्र मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई मंदिरात येणे शक्य नाही. अशा सेवेकऱ्यांनी घरोघरी सप्तशती पारायण करून साजरा करावे. नैसर्गिक आपदा व संकटे यांना दूर करून शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी येणाऱ्या पिकांचे संरक्षण व्हावे, अशी विश्वकल्याणाचा संकल्प करण्यात आदिशक्ती मुक्ताई साहेबांना सप्तशती पारायण प्रसंगी साकडे घालण्यात येणार आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरु माऊली यांच्या शुभाशीर्वादाने आदरणीय गुरुवर्य चंद्रकांत दादासाहेब यांच्या आदेशाने अब्ज चंडी पाठ पारायण सेवेत संकल्पित होऊन नवरात्रानिमित्त व मुक्ताई जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मुक्ताबाई संस्थान कोथळी जुने मंदिर येथे भव्य श्री दुर्गा सप्तशती ( मुक्ताई अष्टक लावून ) पाठ पारायण यांचे नियोजन केले आहे. परमपूज्य गुरु माऊलींना अपेक्षित असलेल्या संकल्पात संकल्पित होऊन अब्ज चंडी अंतर्गत सेवा रुजू करायचे आहे. जास्तीत जास्त सेवेकरी भाविक भक्तांनी उपस्थित राहून सेवा रुजू करावी, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here