साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगाव नगरीचे ग्रामदैवत तथा वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या दिवशी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात होईल.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ना.गिरीश महाजन, ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, आ.सुरेश दामू भोळे, पोलीस अधीक्षक, आ.एकनाथराव खडसे, तहसीलदार, तलाठी, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय पदाधिकारी व कर्मचारी, माजी महापौर, माजी उपमहापौर, विश्व हिंदू परिषदेचे योगेश्वर गर्गे, सनातन संस्थेचे श्री नंदकुमार जाधव, नंदू शेठ आडवाणी, पीपल्स बँकेचे संचालक मोराणकर, डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, आ. शिरीष चौधरी, ललित चौधरी, जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, पिपल बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, गजानन मालपुरे, सुनील भंगाळे, विष्णू भंगाळे, चंद्रकांत गवळी, चंदन कोल्हे, अशोक नकाते, उल्हास पाटील, अशोक नखाते, चंद्रकांत गवळी, ललित कोल्हे तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर रामभक्तांच्या उपस्थितीत व श्रीराम मंदिर संस्थांचे समस्त विश्वस्त मंडळी, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, संजय चौधरी, सदस्य शैलेश पाटील, भानुदास चौधरी, विलास चौधरी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, सुजित पाटील, दिलीप कुलकर्णी, डॉ.विवेक जोशी तसेच रथोत्सवाचे मानकरी, सेवाधारी यांच्या उपस्थित प्रारंभ होईल.
वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांच्या हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती होईल. संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख पाहुणे व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान होईल. रथावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे आदी मुर्त्या असतात. रथाचे अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ तसेच जवळच्या खेड्यावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा भव्य दिव्य जलग्राम नगर दिंडी प्रदक्षिणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ होईल.
रथ प्रस्थानाचा मार्ग श्रीराम मंदिर, भोईटेगढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्री मरीमाता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्पहार अर्पण करतील. बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारा वाजेपर्यंत परत येईल. रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येतील तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती होईल. रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भावी दर्शनासाठी येत असतात. प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगाव येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत श्रीराम मंदिरांचे मूळ सत्पुरुष संत अप्पा महाराज यांनी हिंदू समाजातील अठरापगड जाती एकत्र करून हा रथोत्सव सोहळा प्रारंभ केला. आज गेले १५० वर्षे झाली जळगावकरांच्या असंख्य भाविक नागरिकांच्या सहकाऱ्यांनी हा रथोत्सवाचा नंदादीप अखंडपणे तेवत आहे.
रथोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती हरिभक्ती परायण गुरुवर्य श्री मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांचे विश्वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, दादा नेवे, सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विवेक पुंडे व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दिलीप कुलकर्णी, सदस्य भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरुण मराठे, दिलीप खडके, देवेश पाठक, उदय पाठक, देविदास बारी, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास शुक्ल, बापू शुक्ल, सुनील शिंपी, सदाशिव तांबट, गणेश दायमा, जितेंद्र वाळके, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी ,विनायक जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी, शंकर चौधरी, घनःश्याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनील पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडणीस, राजू कोळी व समस्त श्रीमान भक्त मानकरी सेवेकरी मंडळी परिश्रम घेत आहे. रथोत्सवात अनेक श्रीराम सेवक आपली सेवा अर्पण करत असतात.