वार्षिक सभेत असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील एकता रिटेल किराणा असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेत असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी श्रीचंद आडवाणी, कार्याध्यक्षपदी शांतीलाल नावरकर, सचिवपदी पंकज बाविस्कर यांची निवड करण्यात आली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे मालपाणी ग्रुपचे चेअरमन राजेश मालपाणी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मधुलिका सोनवणे उपस्थित होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कांकरिया, दिलीप जैन, ताराचंद कृपलानी, सचिव शांतीलाल नावरकर उपस्थित होते.
सभेत राजेश मालपाणी यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीत व्यापार कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांना व्यवसायातील यशस्वीतेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यानंतर प्रा. मधुलिका सोनवणे यांनी रिटेल तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. यशस्वीतेसाठी सचिन छाजेड, शब्बीर भावनगरवाला, प्रकाश वाणी, अजय सोनी, अजय कुलकर्णी, सतीश अग्रवाल यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.