उपाध्यक्षपदी गणेश जाधव तर सचिवपदी अजय जाधव यांचा समावेश
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
भटक्या विमुक्त बहुजन महासंघाची जामनेर तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. त्यात जामनेर तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रावण भावडू जाधव (कैकाडी) यांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुमार जाधव आणि सचिव श्रीकृष्ण बोटुळे यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र श्रावण जाधव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण निस्वार्थी भावनेने भटक्या विमुक्त समाजासाठी अविरत कार्य करत आहेत. आपल्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपली जामनेर तालुका भटक्या विमुक्त बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. श्रावण जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी अशी
भटक्या विमुक्त बहुजन महासंघाची तालुक्याच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गणेश जाधव-कैकाडी पहुर, विजय शंकर शिंदे-वडार, जामनेर, राजू देवरीलाल नाईक खडकी, सचिवपदी अजय जाधव-कैकाडी जामनेर, सहसचिव शाम जाधव-कैकाडी पाळधी, खजिनदार शाम रघुनाथ जाधव, संघटकपदी राहुल रामलाल पंचाळ जामनेर, कार्याध्यक्षपदी अजय राजु शिंदे- वडार तर सदस्यांमध्ये राजु जाधव, संजय जाधव यांचा समावेश आहे.