Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नेहरू युवा केंद्राचे श्रमदान, मेहरुण तलाव परिसराची केली स्वच्छता
    जळगाव

    नेहरू युवा केंद्राचे श्रमदान, मेहरुण तलाव परिसराची केली स्वच्छता

    SaimatBy SaimatSeptember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

     

    जळगावसह देशभरात गुरुवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील मेहरुण तलाव परिसरात विसर्जनानंतर झालेली घाण, विखुरलेले निर्माल्य संकलन करून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य नेहरू केंद्र जळगावतर्फे करण्यात आले. उपक्रमासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे सहकार्य लाभले.

    जळगाव शहरातील मेहरुण तलावात शहरासह परिसरातील सर्व लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. गुरुवारी तलावात गणेश मूर्ती विसर्जन करताना अनेकांनी निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा तलाव परिसरातच टाकला होता. तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी जळगाव शहर मनपातर्फे विविध संस्थांना निवेदन पाठविण्यात आले होते.

    भारत सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. १ तास स्वच्छतेसाठी हा प्रण लक्षात घेत स्वयंसेवकांनी आणि श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, युवा स्वयंसेवक शाहरुख पिंजारी, हेतल पाटील, अजय जाधव यांच्यासह श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी, शिक्षक अतुल चाटे, संजय बडगुजर, लिपीक भगवान लाडवंजारी आदींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026

    Varangaon : वरणगाव रस्त्यावर मालवाहू गाडी जळून खाक

    March 23, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.