Soygaon : शॉर्ट सर्किटने शेताला लागली आग;-ठिबक संच जळून खाक-जरंडीत घटना

0
140

साईमत सोयगाव प्रतिनिधी

हवेने मुख्य लाईनचे वीज (Electricity) तार एकमेकांना स्पर्शून झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे शेतीला (Farm) आग लागल्याची घटना  दुपारी एक वाजेच्या सुमारास जरंडी शिवारात घडली दरम्यान शेतातील आगीमुळे अंथरलेल्या तीन एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे.

राजेंद्र पांडुरंग चौधरी गट क्र-३०१ मध्ये तीन एकर क्षेत्रावर अंथरलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या तर या आगीत इतर शेती उपयुक्त साहित्यही खाक झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे यामध्ये दोन लाख चाळीस हजार रु चे ठिबक सह इतर साहित्य कोळसा झाला आहे.

दरम्यान आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांसह पंधरा जणांनी शेतातील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले अखेर सायंकाळी चार वाजता ही आग नियंत्रणात आली होती या आगीत ठिबक सिंचनच्या नळ्या व इतर साहित्याचा कोळसा झाला होता दरम्यान याप्रकरणी अद्यापही महसूल, कृषी व महावितरण ने संयुक्त पंचनामा केला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here