धक्कादायक : जळगावात १५ वर्षीय मुलीचं लावलं लग्न…नवरीने ‘असा’ शिकविला धडा !

0
17

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी

येथील अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलीने अतिशय धाडसाने या लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून पळ काढला आणि थेट अंबड पोलीस ठाणं गाठलं. यानंतर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा विवाह बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई आणि मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचं सांगून मला माहेरी घेऊन जा, अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणलं. मात्र गत महिन्यात २३ जुलै रोजी तिचा सासरा तिला घेण्यासाठी जळगावला गेला. यावेळी सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली आणि दुसऱ्या बसने जालना जिल्ह्यातील अंबडला पोहोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here