धक्कादायक! दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर खळबळ

0
24

दिल्ली :

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी आज सकाळी मिळाली होती. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सकाळी साडेसात वाजता प्रवाशांचे बोर्डिंग सुरू असताना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ दिल्ली विमानतळावर विमानातून बाहेर काढण्यात आले.

“१८ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली ते पुण्याला जाणारे विमान UK971 ला अनिवार्य सुरक्षा तपासणीमुळे उशीर झाला आहे. आम्ही यासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत आहोत”, विस्ताराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात ही माहिती दिली.

दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आणि त्यांचे सामान विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. “आम्ही आमच्या ग्राहकांना अल्पोपहार दिला असून त्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करत आहोत”, असंही प्रवक्त्याने पुढे सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून धमकीचे असे फोन येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सक्रिय आहेत. धमक्यांचे फोन प्राप्त झाल्यावर संबंधित फोनपर्यंत तपास केल्यानंतर कोणीतरी फेक कॉल असल्याचे सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here