शिवसेनेला धक्का ; आता माजी आमदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर? बॅनरही झळकले

0
17

औरंगाबाद :वृत्तसंस्था

शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी आता बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्या समर्थकांनी ‘साहेब आता निर्णय घ्या’ असे पोस्टर लावले आहे. त्यामुळे तनवाणी देखील जिल्ह्यातील इतर पाच आमदारांसारखे मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ते शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे महापौर, आमदार अशी त्यांची वाटचाल राहिली. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते शिवसेनेतून बाहेर पडत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष अंबादास दानवे यांच्या प्रयत्नानंतर ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले. मात्र शिवसेनेत प्रवेश करून अडीच वर्षाचा कालावधी पार पडला. मात्र पक्षात अद्यापही तनवाणी यांना कोणतेही पद देण्यात आले नाही.

शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर औरंगाबादमधून मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे असे शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात सहभागी झाले. याच पार्श्वभूमीवर आता मोठा जनाधार असलेले माजी आमदार तानावणी नाराज असल्याच्या चर्चेने शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात तनवाणी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here