साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथून जवळील शिवक्षेत्र खौशी येथून निमगव्हाण जय श्री दादाजी धुनिवाले मंदिराच्या पायथ्याशी तापीनदीवर जाऊन पूजाविधी करून मंदिरावर कावड यात्रेचे सर्वांनी मनोभावे पूजा करून महिलांसह बाळगोपाळांनी लाभ घेतला.
शिवक्षेत्र खौशी येथील मंदिराचे बांधकाम २०१३ मध्ये पूर्ण झाले. त्या दिवसापासून सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. ३१ ऑगष्ट रोजी कावड पदयात्रा सकाळी ७ वाजता खौशी शिवमंदिरापासून निघून नांद्री पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण तापी नदीवर येऊन सकाळी १० वाजता पोहोचली. स्नान, पूजा विधी करून धुनिवाले बाबा मंदिरात यात्रेतील सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन दुपारी १२ वाजता तापी नदीवरून शिवक्षेत्र खौशी पदयात्रा सवाद्य मिरवणुकीने काढण्यात आली.
दीड हजार भाविकांनी यात्रेत नोंदविला सहभाग
सावखेडा, पातोंडा, नांद्री आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत गावात भव्य-दिव्य डीजेच्या तालावर गावाच्या उत्तरेस असलेल्या शिवमंदिरात ओले कपड्यांसह पूजा आरती करून कावड पदयात्रेची सांगता करण्यात आली. पदयात्रेत परिसरासह गावातील आबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला वर्ग उपस्थित झालेला होता. कावड पदयात्रेत बाहेर गावाहुन माहेरवाशिणी महिला जावयांसोबत प्रत्येक घरी घरोघरी येऊन यात्रेचा आनंद द्विगुणित करीत असतात. यात्रेत दीड हजार भाविकांनी सहभाग नोंदविला.



