विठ्ठल-रखुमाईची महापूजा शिवसेनेचा ‘एकनाथ’च करणार…

0
32

साईमत लाईव्ह
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात घडलेल्या अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर शेवटी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या भरवश्यावर जोमाने कामाला लागले आहे. आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल-रखुमाईची महापूजा करणार (Mahapuja of Vitthal Rakhumai )आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.(Eknath Shinde Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईची महापूजा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शासकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना वेग आला आहे. महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष्यानी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विठ्ठल-रखुमाई महापूजेचे निमंत्रण दिले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवून समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी पोहचले होते. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. पण त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शिवसेनेचाच मुख्यमंत्री आता विठ्ठल-रखुमाईची महापूजा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here