केंद्राने दखल घेण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन
साईमत/ न्यूज नेटवर्क/रावेर :
काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात सातत्याने जवान शहीद होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध करीत याबाबत केंद्र शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, अशा आशयाचे निवेदन रावेर तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तहसीलदार बी.ए. कापसे यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जम्मू काश्मीर सीमेवर वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद होत आहेत. ही बाब गंभीर आहे. मात्र, केंद्र सरकार या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र असलेल्या सरकारचा रावेर तालुका शिवसेनेतर्फे घोषणा देऊन निषेध करण्यात आला. यावेळी रावेर तहसीलदार बी.ए.कापसे आणि अपर तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रावेर लोकसभा समन्वयक प्रल्हाद महाजन, उपजिल्हा प्रमुख योगीराज पाटील, अशोक शिंदे, रवींद्र पवार, अविनाश पाटील, सुरेश शिंदे, रावेर तालुका प्रमुख नितीन महाजन, रावेर शहर प्रमुख राकेश घोरपडे, संतोष महाजन, माजी नगरसेवक सुधाकर महाजन, मुबारक तडवी, राष्ट्रवादी पक्षाचे अशोक पाटील, शिवसेनेचे निलेश महाजन, मुकेश पाटील, भाऊलाल महाजन, गोपाळ सुतार, दीपक महाजन, शेख लतिफ, प्रदीप पाटील, राजु लोहार, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.