साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
‘विजय दिवस’ म्हणून मानल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे “विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव” येत्या शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी शहरातील चांडक विद्यालयाच्या प.पू.डॉ. हेडगेवार सभागृहासमोरील मैदानावर येथे साजरा करण्यात येणार आहे. उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख आ. शैलेश पोतदार असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर छत्रपती शिवाजी शैक्षणिक क्रीडा बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके असतील. याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून संघप्रेम व्यक्त करावे, असे आवाहन नगर संघ चालक दामोदर लखानी तथा नगर सह संघचालक राजेश महाजन यांनी केले आहे.
समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व सज्जनांचे रक्षण होवून झालेला विजय म्हणून विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर समाजासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजया दशमीच्या दिवशीच झालेली आहे. त्यामुळे रा.स्व. संघातर्फे “विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अश्विन शु.शके १९४५ युगाब्ध ५१२५ शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी शहरातील चांडक विद्यालयाच्या प.पू.डॉ. हेडगेवार सभागृहासमोरील मैदानावर “विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.