अजित पवार गटात शरद पवारांच्या दिग्गज नेत्यांचा प्रवेश : राजकीय धक्का
साईमत मुंबई प्रतिनिधी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील दिग्गज नेते आणि समर्थकांनी समर्थकांसह अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने शरद पवार यांना धक्का बसला आहे. ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात नवीन वळण घडवून आणणार असून, तिच्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, कैलास पाटील, तिलोत्तमा पाटील, दिलीप सोनवणे आणि दिलीप वाघ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे.
शरद पवार यांनी या घटनेबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी, हा बदल शरद पवार यांच्या पक्षासाठी नक्कीच धोकादायक मानला जात आहे. या सर्व नेत्यांची मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या पक्षप्रवेश केला आहे.
शरद पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आणि ते सुद्धा अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. हा निर्णय शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या गटात नेते जाण्याच्या या घटनेचा राजकीय भूमिकेवर खोलवर परिणाम होईल. भाजप आणि शिवसेना यांनी यावर प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.