पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकते

0
26

पिंपरी- चिंचवड :

पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकते. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही.अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बंँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत. हे सिरम कडून आलेले कमिशन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, पैसे कसे ढापायचे हे शरद पवार यांचे कुटुंब जगाला शिकवू शकते. कोविड काळात वसुलीचा धंदा सुरू होता. ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचा व्यवसाय नाही. अचानक मार्च २०२१ मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत. यांचे कॉन्ट्रिब्यूशन किती? केवळ एक लाख. मग, त्यांच्या खात्यात जमा झालेले ४३५ कोटी हे कमिशन आहे का? असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला असून त्यांनी निगडीतील पीएमआरडीमध्ये रीतसर अर्ज केला आहे. या प्रकरणी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here