राज्यस्तरीय ‌‘आदर्श शिक्षक पुरस्काराने‌’ शरद पाटील सन्मानित

0
51

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

धुळे येथील अजय भवनात नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, नवी दिल्ली यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी विषयाचे शिक्षक शरद भिका पाटील यांना राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपती निवासन (निवृत्त कर्नल, भारतीय सेना), शिवाजी अकलाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.धुळे), गोरख देवरे (राष्ट्रीय अध्यक्ष-नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम), प्रफुल्ल पाटील (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, नैसर्गिक मानवाधिकार परिषद फोरम) यांच्या हस्ते देण्यात आला.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानद सचिव प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार, प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून तसेच सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here