शानभाग विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा “शुभेच्छा समारंभ” उत्साहात

0
30

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय घोष यांची उपस्थिती होती.

व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकरजी गोरे , मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला शालेय परिसरात नव्याने तयार केलेले सायन्स पार्क, गणित प्रयोगशाळा तसेच नुतनीकरण करण्यात आलेले गुरुकुल कार्यालय, ग्रंथालय आणि जीव- भौतिक प्रयोगशाळेचे ओपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या विद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच त्यांनी सांगितले कि, आपल्या विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थी चंचल पाटील, खुशी लुंकड यांनी विद्यालयाचे शिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
शालेय विद्यार्थी नकुल पाटील, सृष्टी बागुल, गजेंद्र भारंबे यांनी आपले मनोगत मांडले तर हीना मेटो, प्राप्ती चौधरी, हिमांगी पवार, कपिल पाटील, सुयश चौधरी, ऋषिकेश पाटील आणि गायत्री बारी यांनी कभी अलविदा न कहेना हे गीत संगीतबद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या. समीक्षा कोठावदे हिने कविता सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांतर्फे अनिल धामणे यांनी आपले मनोगत मांडले. पालकांतर्फे महेश कोठावदे यांनी आपले मनोगत मांडले.
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शालेय दिवस हे आपल्या जीवनातील सुवर्ण क्षण असतात ते जपून ठेवले पाहिजेत, शाळा म्हणजे तुमच्यासाठी एक लॉचिंग पॅड आहे. यावरून तुम्हाला पुढील आयुष्यात उंच भरारी घ्यावयाची आहे असे सांगून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक डॉ. संजय घोष म्हणाले कि, मी शाळेत असतांना मला शाळेने आत्मविश्वास दिला, माझ्यात असलेल्या गुणाची मला ओळख करवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले कि, पालक आणि शिक्षकांशी नेहमी सुसंवाद असू द्या. तसेच आपल्या पुढील आयुष्यात आपले करियर निवडतांना आपल्यालात असलेल्या क्षमता ओळखून निवड करा. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कार मांगल्य, पवित्रता, सत्यता, देशभक्ती आणि ज्ञानरूपी मूल्याचा वसा आणि वारसा असाच चालू राहावा म्हणून पेटती मशाल इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या हाती सोपविली. आभार सुर्यकांत पाटील यांनी मानले.
या प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी स्नेहभोजन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख अनुराधा देशमुख , स्वप्नील पाटील यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here