शानभाग विद्यालयाच्या मुलींच्या सॉफ्टबॉल संघाला राज्यस्तरावर विजेतेपद

0
45

साईमत जळगाव प्रतिनिधी

क्रीड़ा संकुल नागपुर येथे १७ वर्षाखालील मुले /मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अटितटीच्या अंतिम सामन्यात कोल्हापुर विभागाचा पराभव करुन स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.

संघातील सृष्टि बागुल, जानवी पाटील, चैताली पाटील यांची उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड होवून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. विजयी संघाचे अभिनंदन विवेकानंद प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळ तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्यातर्फे करण्यात आले.

या स्पर्धेसाठी विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय यादव, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे, ललित लोहार, प्रशिक्षक मोहित पाटील, शुभांगी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here