साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील कुर्ऱ्हे खु.येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लालबावटा शेतमजूर युनियन यांच्याकडून शहीद भगतसिंह यांना माल्यार्पण करुन जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच कॉ. निलाबाई अभिमन भील होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी माल्यार्पण करुन भगतसिंह यांना अभिवादन करुन घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी शहीद भगतसिंह यांच्या स्वातंत्र्याबद्दल विचार मांडले. तसेच शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव गोरख वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन शाखा कुर्ऱ्हे खु. यांच्याकडून सरपंच निलाबाई भील यांना भगतसिंह यांचा फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी भेट देण्यात आला. कार्यक्रमाला भाकपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण मैराळे, शाम अधिकार पारधी (अध्यक्ष-लालबावटा शेतमजूर युनियन, कुर्ऱ्हे खु), प्रकाश खैरनार, राजेंद्र लोहार, हरिश्चंद्र पाटील, गोकुळ पारधी, महेंद्र बच्छाव, विशाल मैराळे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तालुका सचिव वाल्मिक मैराळे यांनी आभार मानले.