Shahadya’s Darshan Dhobi : मॉडेलिंग स्पर्धेत शहाद्याचा दर्शन धोबी ठरला ‘ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र’

0
10

दर्शनचा भविष्यात अभिनेत्यासह मॉडेल बनण्याचा मानस

साईमत/शहादा/प्रतिनिधी :

येथील दर्शन विक्रांत धोबी हा धुळे येथे नुकत्याच झालेल्या मॉडेलिंग स्पर्धेत ‘ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ विजेता ठरला आहे. द गेम चेंजर प्रोडक्शन हाऊसकडून फाउंडर अनिकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे मॉडलिंग प्रेझेंट शो घेण्यात आला. कार्यक्रमात शरद उगले आणि गायत्री ठाकूर परीक्षक होते. त्यांनी ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र मिस्टर ग्रुपचा विजेता कंटेस्टंट नंबर ४० दर्शनची निवड केली. तो शहादा येथील शिरूर चौफुली येथील प्रकाश नगरातील रहिवासी विक्रांत धोबी यांचा चिरंजीव आहे.

दर्शनने दहावीपर्यंत व्हॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेत शिक्षण घेतले आहे. तसेच कै. सौ. जी. एफ. पाटील कॉलेजमध्ये बारावीत उत्तीर्ण झाला. तो ५ वर्षापासून मॉडेलिंगमध्ये मेहनत घेत आहे. त्याने मॉडेलिंगचा क्लास न लावता राहत्या घरावरील टेरेसवर रॅम्प वॉकचा सराव करत होता. त्याने मॉडेलिंग शोमध्ये अनेक ठिकाणी सहभाग घेतला आहे. त्याला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड आहे. त्यामुळे तो मॉडेलिंग स्पोर्ट्स सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

‘दर्शनवर’ कौतुकाचा वर्षाव

त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. भविष्यात चांगला अभिनेता होण्याची त्याची इच्छा असून तो नक्कीच चांगला अभिनेता बनू शकतो. तसेच एक चांगला मॉडेलही बनू शकतो, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. दर्शनने मॉडेलिंग स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल त्याच्यावर शहादा शहरातील परीट समाज, शिक्षक, मित्र परिवाराने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here