साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रेल येथील १९ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील रेल गावात १९ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. शनिवारी, ७ ऑक्टोबर पहाटे ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारा अशोक हिरामण भील याने महिलेच्या घरात घुसून तिचे आई-बहीण व महिलेला अश्लील शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात अशोक भील याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता संशयित आरोपी अशोक हिरामण भील याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल पाटील करीत आहे.