साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
येथील आर. टी. लेले हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीसिंह सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर भाषणे दिली. इयत्ता अकरावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत आणि बोलीभाषेत गीत गायन केले. तसेच काही विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडून घडविले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, सेवालाल महाराज यांची शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच एम. एस. आगारे, व्ही.व्ही.बोरसे, आर.टी.देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एस. आर. सोनवणे, संदीप राठोड (उपसरपंच) पिंपळगाव कमानी, एम. बी. पवार, एस.एस. पाटील, शाळेचे वरीष्ठ लिपीक किशोर पाटील, विद्या भालेराव, रंजना थोरात तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार एस. एस. भडांगे यांनी मानले. कार्यक्रमाचा राष्ट्रीय गीताने समारोप झाला.