बोदवडला मोबाईल व्हॅनद्वारा दाखल प्रकरणांचा निपटारा

0
22

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

येथील न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरत्या लोक अदालतीचे आयोजन केले होते. याप्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड.अर्जुन टी. पाटील यांनी केले. बोदवड येथील न्यायालयात फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्या. क्यू.ए.एन. सरवरी होते. फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीत ५० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. मोबाईल व्हॅनद्वारा दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणून ॲड. अर्जुन टी. पाटील, ॲड. के. एस. इंगळे उपस्थित होते. फिरत्या मोबाईल व्हॅन न्यायालयातर्फे पक्षकाराच्या खटल्यांचा ताबडतोब निपटारा झाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

शिबिराला ॲड. धनराज प्रजापती, ॲड. निलेश लढे, ॲड. व्ही. पी. मंगळकर, बोदवड तालुका वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ॲड.अमोलसिंग पाटील, ॲड.किशोर महाजन, न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे, विधी प्राधिकरण योगेश पाटील, शैलेश पडसे, व्ही.एन. गरड, एन.एन.परसोडे, अविनाश पोफळे, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.डी.महाजन, संजय मानकर, परमेश्‍वर जाधव, प्रशांतकुमार बेदरकर, बोदवड तालुका वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग व बिलीफ यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here