कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विविध विषयांवर सेमिनार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित चार दिवसीय प्रबोधन, जागरूकता आणि नवविचार संस्कार कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी ७ ते ९.३० या वेळेत पार पडली. ही कार्यशाळा पाचवी ते दहावी मधील १२०० विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभागी होऊन यशस्वी केली. चार दिवसीय व्याख्यानमालेत खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अंतरिक्षाची सफर”, प्रा. डॉ. रवींद्रकुमार बावणे यांचे “संशोधनाकडे वळा”, प्रा. दिलीप भारंबे यांचे “हसत, खेळत, गणित”, मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी आनंद ढिवरे आणि प्रा. दिलीप भारंबे यांचे “चमत्कारामागील विज्ञान” विषयांवर सेमिनार घेण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्य, विविध कृतीयुक्त उपक्रम, एलसीडी प्रोजेक्टर आणि लॅपटॉपच्या सहाय्याने विज्ञान, गणित व भूगोल विषयातील संकल्पना सोप्या उदाहरणांसह समजावून सांगितल्या.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्य, सूर्यमाला, विविध ग्रह व उपग्रह, चांद्रयान-मंगळयान मोहीम, अंतराळवीरांचे कार्य, संशोधनाचे महत्व, गणितातील विविध संकल्पना, अंधश्रद्धा आणि फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके पाहून सजग होऊन विज्ञानाची कास धरावी आणि संशोधन वृत्तीचा विकास करावा, याचे आवाहन केले.
कार्यशाळेत यांनी घेतला सहभाग
कार्यशाळेत प्रा. उमेश इंगळे, योगेश सोनजे, स्मिता करे, जागृती मोराणकर, मनिषा पवार, रेवती किन्हीकर, सुनीता रोटे, संगीता कुलकर्णी, दीपक पाटील, राकेश चौधरी, श्रीकांत घुगे, सोमनाथ महाजन, कविता कुऱ्हाडे, रेखा पाटील, सुवर्णा वंजारी, जयश्री नेहेते, स्वाती एडके, प्राजक्त प्रचंड, हेमंत सपकाळे, पंकज महाले, प्रणिल येवले, हनुमंत सोनगीरे, गौरव देशमुख, जावेद पटेल यांचा सहभाग होता. यशस्वीतेसाठी मराठी विज्ञान परिषद तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, विवेकानंद प्रतिष्ठानचे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.