साईमत, जळगाव, प्रतिनिधी
शहर व जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल याठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. या वेळी हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मिर्झा यांनी ‘मेजर ध्यानचंदच्या हॉकीमध्ये योगदान’ याविषयी सर्व उपस्थित खेळाडूंना माहिती दिली.
स्पर्धा 17 वर्ष आतील व 19 वर्षा आतील अश्ाा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूलच्या दोन्ही संघ विजयी राहिले.
विजयी व उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, इकबाल मिर्झा, प्रविण पाटील, प्रा. वसीम मिर्झा व मयूर पाटील, शहेबाज शेख यांची उपस्थित संपन्न झाला. ह्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाळण्यात सेपक टकारा राष्ट्रीय खेळाडू मिर्झा आसिफ इकबाल, मुजफ्फर शेख, फैजान शेख, आमिर खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.