Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगावात भाजप स्थापना दिनानिमित्त जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
    जळगाव

    Jalgaon : जळगावात भाजप स्थापना दिनानिमित्त जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

    saimatBy saimatApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पक्षाची एकजूट आणि इतिहासाची ओळख जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

    भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जळगावातील पक्ष कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी पक्षासाठी आयुष्यभर झटणाऱ्या ४६ जेष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाची उजळणी करण्यात आली.

    सन्मानित कार्यकर्त्यांना जनसंघाचा जुना चिन्ह असलेला “दीपक” आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास आमदार राजू मामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, तसेच नगरसेवक उदय भालेराव, विशाल त्रिपाठी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “मंदिराचा कळस जितका महत्त्वाचा असतो, तितकीच पायरीही महत्त्वाची असते,” या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या बलिदानाशिवाय पक्षाची उभारणी अशक्य आहे. तसेच, नवीन पिढीला पक्षाचा इतिहास आणि त्यामागील संघर्ष समजावून सांगणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    आमदार राजू मामा भोळे यांनी आपल्या मनोगतात पक्षाची विचारसरणी आणि कार्यकर्त्यांची भूमिका अधोरेखित केली. “सर्वप्रथम राष्ट्र, त्यानंतर समाज, पक्ष आणि शेवटी मी” या विचारधारेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची वाटचाल यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग बचत गटांमधील महिलांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीचे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

    कार्यक्रमादरम्यान जेष्ठ कार्यकर्त्यांच्या अनुभवांना उजाळा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी सन्मान सोहळ्याचे स्वागत करत पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकजुटीचा संदेश दिला.

    याप्रसंगी महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालानी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, महिला अध्यक्ष नितू परदेशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप रोपे आणि सह संयोजन सागर पाटील यांनी पाहिले.

    हा सन्मान सोहळा फक्त भूतकाळातील कार्यकर्त्यांचा गौरव नाही तर पक्षाच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणेचा स्त्रोतही ठरला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jamner : फत्तेपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका शेत जळून खाक

    April 6, 2026

    Jalgaon : “मॅडम जाऊ नयेत…” विद्यार्थ्यांची पालकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

    April 6, 2026

    Jalgaon : जळगावमध्ये दुचाकी वादात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.