Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
    क्राईम

    महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

    SaimatBy SaimatOctober 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शन नगर, कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाना सापळा रचून वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती याला २५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    सदर कारवाई पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पो.नि. अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांनी केली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.