त्रिपदी परिवारातर्फे नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवार शाखेच्या परिवारातील सदस्य तथा दै. ‘साईमत’ चे ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांचे नुकतेच निधन झाले. प.पु.डॉ. बाबा महाराज यांच्या आज्ञा आणि सूचनेनुसार येत्या रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेसमोरील मार्तंड नागरी सहकारी पतपेढीच्यावरील चिदानंद स्वामी सभागृहात शोकसभा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्यांच्या अकस्मात जाण्याने त्रिपदी परिवारात एका पोकळी निर्माण झाली आहे. ते प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होऊन प्रत्येक कार्यक्रमाची अचूक बातमी तयार करून ती प्रकाशित करीत होते. मात्र, ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्या परिवाराच्या दुःखात अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि जिल्ह्यातील सर्व शाखा सहभागी आहेत. कार्यक्रमास त्रिपदी परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून काळुंखे यांच्या परिवारातील दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन त्रिपदी परिवाराने केले आहे.
            


