साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ ।
महाराष्ट्रात माळी समाजाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे माळी समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे, असा ठराव भुसावळला झालेल्या माळी हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी अविनाश ठाकरे होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोदचे माजी आमदार कृष्णकांत इंगळे, उत्तमराव महाजन, विजय महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, पद्माकर महाजन, श्रीमती गुरुनुले, वंदना तिखे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, ज्या राजकीय पक्षाने माळी समाजाचे उमेदवार दिले, त्या पक्षाच्या पाठीशी माळी समाज उभा राहणार आहे. तसेच त्या व्यक्तीस निवडून आणण्याचे कार्य माळी समाज हक्क परिषद करणार आहे. आम्ही सर्व पक्षाकडे माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी मागणी करणार आहे.
बैठकीला महाराष्ट्रातून माळी समाजाचे २०० प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक कैलास महाजन, संतोष इंगळे, राजेंद्र महाजन होते. यशस्वीतेसाठी माळी समाज हक्क परिषदेचे संतोष माळी, सुभाष महाजन, सारंगधर माळी, पवन माळी, धनंजय महाजन आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.कांडेलकर तर आभार गजेंद्र महाजन यांनी मानले.