‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा

0
31

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष व समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेचे दशकपूर्ती वर्षानिमित्त सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मवीरांना प्रतिष्ठानतर्फे ‘समाज चिंतामणी राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात समाजसेवा, साहित्य, प्रशासन, कृषी, पर्यावरण, शिक्षण, कला, क्रीडा, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मवीरांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे.

प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. नामांकनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवलेले नाही.
सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी आपले प्रस्ताव येत्या ३० मे पर्यंत केवळ पोस्टानेच पाठविण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग सोनवणे, सचिव शालिनी सैंदाणे यांनी केले आहे.

मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता- अध्यक्ष आर. डी. कोळी ११, सिद्धेश्‍वर नगर, जळगाव- पिन कोड ४२५००२, मो. क्र.९८६०७०५१०८ असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here