साईमत जळगाव प्रतिनिधी
शैक्षणिक विकासाचे प्रणेते, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मेहरूण येथील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
पवित्र कुराणाचे पठण मुहम्मद इस्माईल या विद्यार्थ्याने तर अल्मास सय्यद उस्मान यांनी हम्द शरीफ, अनम खान यांनी नात-ए-पाक सादर केले. त्यानंतर उर्दू आणि इतिहास विभागाच्या सुमय्या शाह यांनी सर सय्यद यांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल माहिती दिली. प्रा. शेख झियान अहमद यांनी सर सय्यद यांच्या व्यक्तिमत्त्वाची, सामाजिक कार्याची गाथा आणि अलिगढ विद्यापीठाची स्थापना विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात केली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या आफिफा शाहीन म्हणाल्या की, सर सय्यद यांच्याप्रमाणेच देश आणि राष्ट्रासाठी अधिक गरज भासत आहे. सर सय्यद यांची शैक्षणिक मशाल घेऊन राष्ट्रातील निराशेचा अंधार दूर करण्यासाठी सहकार्य करावे. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सय्यद मुख्तार, अतिकुल्ला खान देखील उपस्थित होते.आभार फरहाना मॅडम यांनी मानले.