साईमत बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील हरण खेड गावाच्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून मिळणे बाबत बांधकाम विभागाला सरपंचांचा आत्मदहन करण्याचा इशारा दिल्या नंतरही कार्यवाही न झाल्याने निमखेड फाटा ते हरणखेड रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या सुमारास सरपंच रूपेश गांधी रस्त्यावर येऊन अंगावर डीझल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला , मात्र पाळतीवर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गांधी यांना ताब्यात घेतले.
हरणखेडचे सरपंच रुपेश गांधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हरण खेड गावापासून जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सुशोभीकरण व स्ट्रीट लाईट लावणे कामे रस्ते रुंदीकरण मिळणे बाबत वारंवार मागणी केली होती .पण या वर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सरपंच रुपेश गांधी यांनी दिनांक २४ जुलै रोजी सकाळी गावातून आंदोलन ठिकाणी पायी जात १० वाजेच्या सुमारास निमखेड फाटा ते हरण खेड रस्त्यावरती आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी पाळतीवर असलेल्या स.पो.नि.अंकुश जाधव,पोलीस नाईक शशिकांत शिंदे,संदीप झरवाल यांनी गांधी यांनी अचानक अंगावर डिझेल घेतल्याचे भगत धावत जाऊन गांधी यांना ताब्यात घेतले.या वेळी हरणखेड येथील सुभाष बोरोले,श्रीकृष्ण रोकडे,प्रकाश खाचने,कोमल पाटील,प्रफुल्ल वराडे,संजय पाटील,रतनसिंग पाटील, विवेक जोशी,जितेंद्र सौंदाणे,रघुनाथ गवळी, देविदास गवळी, विष्णू खडसे, नाना कळमकर ,नारायण वराडे, निलेश ,कल्याणकर, विनोद सूनसकर, निलेश कल्याणकर, रवींद्र सपकाळ ,रूपेश कळमकर, रमेश पांडे,शरद खडसे,गणेश कल्याणकर,बंटी जोशी,यांच्यासह हरणखेड व वडजी गावचे नागरिक आंदोलनस्थळी आले होते.
या सर्व नागरिकांनी रस्ता रुंदीकरण झालेच पाहिजे अश्या घोषणा दिल्या तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याबद्दल तसेच आज सुद्धा सहाय्यक अभियंता प्रवीण बेंडकुळे यांनी रस्त्याची पाहणी करण्यास हजर होऊन कोणतेही आश्वासन न दिल्याने गावकऱ्यांनी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठोस आश्वासन न दिल्याने निषेध व्यक्त केला .व लवकर जर या मागणीनुसार काम केले नाही तर मोठे सामूहिक आंदोलन उभारले जाईल असा इशारा या येळी देण्यात आला.