खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या महिलांच्या बचत गटांना मिळाला रोजगार

0
28

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकातर्फे गणेशोत्सवानिमित्त DAY-NULM अंतर्गत गरीब महिलांच्या बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महानगरपालिकेत पाच दिवसांकरीता १० स्टॉलच्या गरीब महिलांचे बचत गटास मनपा प्रशासनाकडून प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जागा करून दिली आहे.

जळगाव शहरातील नागरिकांना खान्देशी खाद्यपदार्थाचा आनंद व स्वाद एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, या उद्देशाने बचतगटास या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून स्टॉलकरीता सहकार्य शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांच्याकडून मिळाले.

खाद्य पदार्थांची चव चाखावयास मिळणार

खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून नागरिकांना खान्देशी कडी खिचडी, कळण्याची भाकरी, ज्वारीचे धिंडरे, मूग भजी, अंबाडीची भाकरी ठेचा, वडापाव, पाणीपुरी, गव्हाची खीर आदी पदार्थांचा स्वाद, चव चाखावयास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here