साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षा मार्फत झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये विद्यापीठाच्या बी.टेक. केमीकल इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांची गेक्स्कॉन इंडिया प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.
निकीता पाटील व कल्पेश राणे या दोन विद्यार्थ्यांची याच कंपनीत इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. कंपनीचे उपाध्यक्ष सत्य मंगीपुडी, व्यवस्थापक अनिल अव्हरे व गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. या दोन्ही विद्यार्थ्यांना ३.६० वार्षिक वेतन देण्यात आले. कक्षाचे उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालक प्रा. जे.बी. नाईक, समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.