निवडीत परिसंवादासह अभिवाचनाचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
येथील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात नुकतीच आठव्या कुमार साहित्य संमेलनासाठी निवड फेरी घेण्यात आली. निवड फेरीत जळगाव शहरातील ४० शाळा व जळगाव तालुक्यातील आठ शाळेतील ५७७ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यात असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील मोहिनी पाटील नववी ब, सानिया चौधरी नववी अ, तृप्ती बिऱ्हाडे दहावी अ, प्रज्ञा कापडणे दहावी ब यांची परिसंवादासाठी तर यामिनी भोळे दहावी अ व प्रज्ञा कापडणे दहावी ब यांची अभिवाचनासाठी निवड झाली.
या विद्यार्थिनींना १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या खान्देशस्तरीय आठव्या कुमार साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, उपशिक्षिका अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, चेअरमन डी.यू. भोळे यांच्यासह संचालक मंडळाने विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.