गुड शेपर्ड अकॅडमीच्या प्रसाद पाटीलची राज्यस्तरीय कला स्पर्धेसाठी निवड

0
22

गुड शेपर्ड अकॅडमीच्या प्रसाद पाटीलची राज्यस्तरीय कला स्पर्धेसाठी निवड

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयात कला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत समूहगीत गायन, पारंपरिक कथा वाचन,शास्त्रीय सुरवाद्य वादन अशा कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सुरवाद्य वादन कला प्रकारात गुड शेफर्ड शाळेतील दहावीचा विद्यार्थी प्रसाद केशव पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी जळगाव जिल्ह्यातून निवड झाली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक तुषार मुजुमदार तसेच गौरव काळंगे, अजिंक्य त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक डॅनियल दाखले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here