आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी कोळगाव महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

0
21

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलीत कला व विज्ञान महाविद्यालयातील जय आत्माराम बिऱ्हाडे (६० किलो ग्रीकरोमन प्रथम), सयाजी बापू मदने (७४ किलो फ्रीस्टाईल, प्रथम), शिवम सतीश संकपाळ (७९ किलो, फ्रीस्टाईल, प्रथम) यांनी डी.डी.एस.पी.महाविद्यालय, एरंडोल येथे क.ब.चौधरी, उ.म.वि.अंतर्गत आयोजित, एरंडोल विभाग आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत आपआपल्या गटात विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांची फैजपूरला होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिघांना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, कार्यवाहक रघुनाथ पाटील, पहेलवान अनिल बिऱ्हाडे, पहेलवान अशोक पाटील, प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तिघांच्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here