निवडीत हिमांशु भालेराव, नेत्रा पाटील, जान्हवी कुलकर्णी यांचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
येथील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात आठवे कुमार साहित्य संमेलनासाठी नुकतीच निवड फेरी घेण्यात आली. त्यात जळगाव शहरातील ४० शाळा व जळगाव तालुक्यातील आठ शाळांमधील ४७७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात कै.सुनीता जगन्नाथ वाणी- भगीरथ शाळेतील विद्यार्थ्यांची कुमार साहित्य संमेलनासाठी निवड केली आहे. त्यात नेत्रा गुणवंतसिंग पाटील (आठवी) हिची कथा कथनासाठी निवड झाली आहे तर जान्हवी निलेश कुलकर्णी (आठवी), हिमांशू शरद भालेराव (दहावी) या विद्यार्थ्यांची काव्य वाचनासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात कथा कथन व काव्य वाचनाची संधी लाभणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड यांनी कौतुक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर. डी. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.