संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे इंसाफ बँकेत निवड

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर ।

संत मुक्ताबाई महाविद्यालयात २८ जून रोजी इसाफ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या सेलच्या अंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन केले होते. यामध्ये बी.ए, बी.कॉम, बी.एससी व एम.कॉमचे ५५ विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इसाफ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे चेतन शहारे आणि प्रतीक शिरसाठे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये असिस्टंट कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह व कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसर मुलाखतीचे आयोजन केले जाते हा खरोखर ह्या महाविद्यालयाचा मोठा उपक्रम असल्याचे बँकेचे व्यवस्थापक चेतन शहारे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांचा संत मुक्ताबाई महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर महाविद्यालयातर्फे नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्‍न कमी होईल आणि विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अजित कुलकर्णी यांनी मुलाखतीचे नियोजन केले. यशस्वीतेसाठी प्रा.ए.बी.शेख, प्रा. मोनाली पाटील, प्रा.भावना गोराणे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here