शानभाग विद्यालयात स्काऊट गाईडचे निसर्ग शिबीर उत्साहात

0
29

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय स्काऊट गाईड शिबिर उत्साहवर्धक व निसर्गरम्य वातावरणात उत्साहात झाले. शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. या प्रसंगी गुरुकुल विभाग प्रमुख शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्काऊट म्हणजे काय ? शील, कौशल्य आणि शिस्त यावर रवींद्र सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड शिक्षिका सुरेखा शिवरामे व नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध व्यायाम प्रकार करून घेतले. त्यात व्यायाम प्रकारात नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून ‘एक होता डोंगर’ या कृती गीतावर काही कृती करून घेतल्या. विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगण्यात आला. सांकेतिक खुणा, आवाज, सांकेतिक खुणांचा अर्थ अशी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी संघ कोपरा सजावट केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवले. पदार्थाचे परीक्षण शशिकांत पाटील , शिबिर प्रमुख अनिल वैद्य, प्रवीण पाटील, गोपाळ कुरकुरे, विनोद पाटील, धनश्री जोशी यांनी केले.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या आजी-आजोबांशी गप्पा गोष्टी केल्या. वृद्धाश्रम प्रमुख प्रदीप कुलकर्णी यांनी वृद्धाश्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाची स्वच्छता केली.
विद्यार्थ्यांना प्रथमोउपचाराचे मार्गदर्शन रवींद्र सैदाणे यांनी केले .त्यानंतर खजिना शोध हा खेळ घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जगदीश चौधरी याच्या सोबत सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी शिबिरात आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले, तसेच शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील , राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले व शिबिराचा समारोप सुरेखा शिवरामे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here