Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»ग्राहकांच्या खिश्याला कात्री-SBI ने व्याजदर वाढवला
    राज्य

    ग्राहकांच्या खिश्याला कात्री-SBI ने व्याजदर वाढवला

    SaimatBy SaimatSeptember 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह प्रतिनिधी:

    देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट (Base Rate)वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय (EMI) वाढणार आहे अथवा ग्राहकांना ईएमआय तोच ठेवण्यासाठी कर्ज कालावधी वाढवावा लागणार आहे.

    एसबीआयने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 आधार अंकांची म्हणजे 0.7 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बेस रेटमध्ये ही 70 आधार अंकांची वाढ झाली. BPLR आता वार्षिक 13.45 टक्के तर बेस रेट 8.70 टक्के असेल. यापूर्वी 15 जून 2022 रोजी हे दर वाढवण्यात आले होते.

    फ्लोटिंग दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता वाढेल. वाढलेल्या व्याजदराची रक्कम त्यांच्या ईएमआयमध्ये (EMI) समाविष्ट होईल. त्यामुळे हप्ता वाढेल. काही ग्राहक हप्त्याचा भार वाढू नये यासाठी कर्ज कालावधी वाढवू शकतात.

    ज्यांनी जुलै 2010 आणि मार्च 2016 यादरम्यान फ्लोटिंग रेट आधारे गृहकर्ज घेतले आहे. त्यांना या व्याजदर वाढीचा फटका बसणार आहे.बेंचमार्क हा व्याज दरांवर परिणाम करणारा मानक दर आहे. या दरांमुळे कर्ज प्रकरणातील व्याजांचे दर निश्चित करण्यात येतात.

    भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनवाढीचा अंदाज घेत रेपो दरात 0.5 टक्क्यांची वाढ केली. या वर्षाच्या सुरुवातीला व्याजदरात वाढ करण्यात आली होती. आरबीआयने तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे.  त्यामुळे बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृह, वाहन कर्ज वाढले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Maharashtra Monsoon : मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

    April 13, 2026

    Trump Warning : चीनने इराणला शस्त्र दिल्यास परिणाम भोगावे लागतील; ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा

    April 12, 2026

    Buldhana : आधी शॉर्टसर्किट, नंतर सिलिंडर स्फोट; संपूर्ण घर आगीत भस्म

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.