शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
तालुक्यातील अनुराबाद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत एसबीआय कृषी विकास शाखा, मलकापूरतर्फे शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रीराम मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कर्ज मर्यादा तसेच खातेविषयक विविध अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
एसबीआय कृषी विकास शाखेचे फिल्ड अधिकारी कमलेश तरोने व राहुल चित्ते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेत योग्य तो मार्गदर्शन केला. शेतकऱ्यांच्या कर्जाशी संबंधित अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाय सुचविण्यात आले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शेतकरी बांधव आणि एसबीआयचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
