शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून सविता कुमावत यांनी दिला निष्ठेचा संदेश

0
19

निष्ठावंत शिवसैनिकांसाठी काढली दसऱ्यानिमित्त रांगोळी

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावर असलेली निष्ठा, श्रद्धा हीच आहे की, ठाकरे परिवार हाच आपला पक्ष…ठाकरे परिवार हीच आपली निशाणी…. हाच संदेश ‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला आहे. आज अन्‌ उद्याही शेवटपर्यंत आम्ही ठाकरे परिवारासोबत आहोत, असे रांगोळीतून दर्शविण्याचे काम चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई किशोर कुमावत यांनी केले आहे.

त्यांच्या माध्यमातून हा संदेश सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना दसऱ्यानिमित्त रांगोळीतून ‘मशाल’ चिन्ह सर्व मतदारांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम आणि संदेश चिन्ह काढून दर्शविला आहे. ‘मशाल’ चिन्ह कॉलनीतील सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सविताताईंनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here