सावदा पोलिसांचा इंडो तिबेटीयन फोर्सचा सावदा, चिनावलला ‘रुटमार्च’

0
5

चार अधिकारी, ३० जवानांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग

साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली इंडो तिबेटीयन फोर्स व सावदा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त सावदा शहरातून ‘रुटमार्च’ काढण्यात आला. पोलिसांकडून पथसंचलन विधानसभा निवडणुकीत गैरवर्तणूक तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सावदा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी, इंडो तिबेटियन पोलीस फोर्स यांनी संयुक्तपणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावदा शहरातील शस्त्रधारी कर्मचाऱ्यांसह ‘रुटमार्च’ काढण्यात आला.

हे पथसंचालन पोलीस स्थानकातून सुरवात करीत गांधी चौक, गवत बाजार, इंदिरा गांधी चौक, दुर्गा माता चौक, रविवार पेठ, चांदणी चौक अशा मार्गाने काढून परत पोलीस स्थानकात समापन करण्यात आले. पथसंचलनात पथक प्रमुख सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे, राहुल सानप, पीएसआय बशीर तडवी, पो.कॉ.निलेश बाविस्कर, पो.हे.कॉ.उमेश पाटील, गोपनीय शाखेचे देवेंद्र पाटील, मयूर पाटील, यशवंत टहाकळे, मनोज तडवी, बबन तडवी, मोहसीन खान, इंडो तिबेटियन फोर्सचे चार अधिकारी ३० जवानांसह सावदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here