दोन लाखांच्या गुटख्यासह सावदा पोलिसांनी दोघांना पकडले

0
33

वाहनासह मुद्देमाल जप्त, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, वितरण आणि साठा करणे तसेच वाहतुकीस प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थासह गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करतांना दोन आरोपींविरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोघे संशयितांना मुद्देमाल, वाहनासह ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अनिल ओंकार पाटील (वय ४० रा.शिवाजीनगर, जळगाव), रोहीत मुकेश बरकले (वय २२, रा.शिवपूर, ता.भुसावळ) हे सुगंधित तंबाखु व गुटखा हा त्यांच्या कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करीत असल्याबाबतची गोपनिय बातमी सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्याकामी सावदा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकास रवाना करुन आरोपी यांच्यावर सापळा रचुन आरोपींना लुमखेडा, ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रस्त्यावर पाटाचे चारीजवळ पकडून त्यांच्याजवळून दोन लाख ५६० रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखु व गुटखा दुचाकीसह मिळुन आला.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेकाॅ.संजीव चौधरी, पो.काँ.सुनील कुरकुरे, बबन तडवी, उमेश पाटील, विनोद तडवी, समीर तडवी, श्री.पोहेकर, संजय तडवी, खोडपे दादा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here