भ्रष्ट अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांंच्या चौकशीची मागणी, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याकडून सामान्य जनतेला जो त्रास होतोय, त्यांचे वेळेवर काम करीत नसून अश्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी व्हावी, म्हणून चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, जिल्हा संघटक परेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनासह उपोषणास सुरुवात केली आहे.
मुख्यतः तहसीलदार यांच्याकडून प्रलंबित रेशनकार्ड व रेशन संदर्भात अनेक त्रुटी दाखवून नागरिकांना वर्षोनुवर्षे फिरवून त्रास दिला जात आहे. रेशन दुकानदार डिजिटल थंब न घेता धान्य देतात. हा मुख्य मुद्दा असुन चहार्डी व वर्डी येथील पं.स.च्या ग्रामसेवकाच्या अनेक तक्रारी करूनही त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही? म्हणून नागरिकांना प्रश्न पडत आहे. वर्डी येथील ग्रामसेवक कुमावत यांनी एकाच दिवशी १५ लाखांची खरेदी कशी केली.ते स्वतःच एमबी कशी तयार करतात, याबद्दलही अनेक तक्रारी केल्या आहेत.
कृषी, पंचायत समिती, भूमि अभिलेख, सिंचन, वनविभाग, पाणीपुरवठा, या विभागातील अधिकारी कर्मचारी वेळेवर काम करीत नाही. अश्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी व्हावी म्हणून उपोषण करण्यात येत आहे. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सनी सचदेव, युवक अध्यक्ष शुभम सोनवणे, महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष साळुंखे सर, शहराध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपाध्यक्ष गोपाल दाभाडे, सरचिटणीस सुरेश साळुंखे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, मुकेश पाटील, राजेंद्र धनगर, प्रवीण पाटील, निवृत्ती खैरनार, मिलिंद बडगुजर, गोपीचंद बाविस्कर, भरत पाटील, शरद पाटील, जितेंद्र पाटील, गजानन पाटील, सागर कोळी, विठ्ठल धनगर, गोलू पाटील, दामू धनगर, भिमराव कोळी आदी उपस्थित होते.
अनेकांनी आंदोलनाला दिला पाठिंबा
आंदोलनाला अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी व माजी जि.प.सदस्य संभाजी पाटील, गोपाळ महाजन, माजी कृउबाचे अध्यक्ष कांतीलाल पाटील, लहूश धनगर यांनीही पाठिंबा दिला.